बारामती ! लाकडी दांडक्याने मारहाण करत एकाचा खून : सुपे येथील घटना, एकाला अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर 
सुपे ता बारामती येथील एका हॉटेल मधील गल्ल्यातील पैसे चोरल्याप्रकरणी वेटरला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत हॉटेलचालकावर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          याबाबत विशाल श्रीराम गहुकार रा.अंजनगाव बारी सेंट्रल बँके जवळ ता.जि.अमरावती याने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून मच्छिंद्र दत्तात्रय काळखैरे रा. काळखैरेवाडी ता.बारामती जि.पुणे याला पोलिसांनी अटक केली आहे. दि २ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सुपे ता.बारामती जि.पुणे गावचे हाद्दीत हाँटेल श्रीकृष्णचे जवळ वाँशिंग सेंटर समोर हा प्रकार घातला 
यामध्ये श्रीराम भदुजी गहुकार वय ४२ वर्षे  रा.अंजनगाव बारी ता.जि.अमरावती यांचा मृत्यू झाला आहे. 
         वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील मयताने आरोपी मजकुर याचे हाँटेलच्या गल्लयातील पैसे चोरल्याचे संशयावरुन आरोपी मजकुर याने मयतास हाताने तसेच लाकडी दांडक्याने पोटाचे उजवे बाजुस बरकडीवर तसेच पाठीवर  तसेच शरीरावर इतर ठिकाणी जबर मारहान करुन त्यांचा खुन केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करत आहेत.  

To Top