सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर निगडे ता.भोर च्या ३१ व्या गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ बुधवार दि.१४ राजगड कारखाना संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कारखान्याने मागील गळीत हंगामात १ लाख ९६ हजार २३५ टन ऊस गाळप करून १ लाख ७० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पन्न केले होते.यंदा २ लाख ५० हजार टन ऊस गाळपाची उद्दिष्ट कारखान्याने ठेवले असून प्रतिदिन २ हजार टनप्रमाणे नियोजन केले गेले आहे.तर कारखाना कार्यक्षेत्रात सर्व विभागवार ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपट सुके, संचालक शिवनाना कोंडे, उत्तम थोपटे ,प्रताप शीळीमकर ,शोभा जाधव ,सुधीर खोपडे, आबा शेलार ,विकास कोंडे, सुभाष कोंढाळकर सुरेखा निगडे, अनंत सेंडकर,माजी संचालक ,चंद्रकांत सेंडकर आदींसह शेतकरी ,खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.