सोमेश्वर रिपोर्टर टिम---------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
नवी मुंबई घणसोली येथे जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित शहीद जवान अशोक धनावडे स्मृती चषक स्पर्धेत जावली तालुक्यातील आनेवाडी येथील श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब आनेवाडी या संघाने प्रथम क्रमांक मिळवीत यश संपादन केले. अंतिम सामन्यात त्यांनी काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी यांचा चार चेंडू राखून पराभव केला
या स्पर्धेत जावली तालुक्यातील एकूण ३२ संघ सहभागी झाले होते, मुंबई येथील क्रिकेट स्पर्धेत प्रथमच आनेवाडीचा संघ खेळाला असून त्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळविल्याने आनेवाडी ग्रामस्थांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून या स्पर्धेत आनेवाडी संघाने प्रथम क्रमांक मिळविलाच सोबत संघांचे कर्णधार चेतन फरांदे यास मॅन ऑफ द सिरीज,अभिषेक फरांदे यास बेस्ट बॉलर व अमित चव्हाण यास गेम चेंजर ही व्ययक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.आनेवाडी गावाला क्रिकेट खेळाची मोठी परंपरा असून अनेकांनी तालुक्यात व सातारा जिल्ह्यात देखील आनेवाडी गावचा दबदबा निर्माण केला आहे, तीच परंपरा पुढे घेऊन जात या युवकांनी मुंबई मधे विजय मिळवीत गावचे नाव उज्ज्वल केले असून या विजेत्या संघात अभिषेक फरांदे, अमित चव्हाण, चेतन फरांदे, अनिकेत देशमाने, आकाश देशमाने, बळीराम भजणे, महेश फरांदे, सुमित शिंदे उमेश फरांदे, अंजुम पवार,रजत खैरनार, ऋषिकेश फरांदे,प्रणय फरांदे,यशराज शिंदे,अविराज धुमाळ, मयुर फरांदे या खेळाडूंनी सहभाग घेत संघाला विजय मिळवून दिला.
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आनेवाडीच्या संघाला मुंबई स्थित ग्रामस्थ भरत फरांदे, सुभाष एकनाथ फरांदे, राजेश फरांदे बाळकृष्ण फरांदे यांनी मोलाची साथ दिली, विजयी संघातील खेळाडू व ट्रॉफी ची आनेवाडी गावात मिरवणूक काढत जल्लोष साजरा करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धेतील विजयी चषक भैरवनाथ चरणी अर्पण करीत असून ते कायम स्वरूपी मंदिरात ठेवणार असून मुंबई स्थित ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, तसेच आनेवाडी ग्रामस्थ कायम आमच्या पाठीशी राहिले.
चेतन फरांदे, कर्णधार भैरवनाथ क्रिकेट क्लब आनेवाडी सर्व खेळाडूंनी एकजुटीने, नियोजन बद्ध खेळल्याने विजय मिळाला असून त्यांनी घेतलेल्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले, चार खेळाडूंची तबियत बिघडली असताना देखील ते गावासाठी व टिम साठी खेळले त्यामुळेच संघ विजयी ठरला
बाळकृष्ण फरांदे, मुंबई स्थित आनेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.