phaltan breaking ! बँकेची १ कोटी १५ लाखांच्या फसवणूक प्रकरणी दिगंबर आगवणेसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
बँकेची १ कोटी १५ लाखांच्या फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे सह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
         याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिगंबर रोहिदास आगवणे, जयश्री दिगंबर आगवणे, रोहिदास नामदेव आगवणे, धर्मराज आगवणे, भीमराव गुलाबराव माने सर्व राहणार गिरवी, तालुका फलटण यांनी संगनमताने सन २०१४ मध्ये सर्वे नंबर ६४/४ पिंपळवाडी, तालुका फलटण येथील ४० गुंठे जमीन ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक व बँक ऑफ इंडिया या बँकांना तारण ठेवून त्यावर १४२ कोटी १३ लाख रुपये कर्ज घेतले होते. ही बाब स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यापासून मुद्दामून लपवून फसवण्याच्या उद्देशाने त्याच जमिनीवर १ कोटी १५ लाख रुपये तारण कर्ज घेतले. बँकेचा विश्वासघात केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया गोडोली शाखेतर्फे संदीप राव कांबळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करीत आहेत.
To Top