सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गावरील निगडे ता.भोर येथे विजेचा शॉक लागून चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.१५ घडली.दुर्दैवी दुर्घटनेमुळे निगडे गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
गुंजवणी नदी पात्रातील पाण्याच्या बंधाऱ्यांमध्ये मोटर बसवण्यासाठी गेले असताना अचानक वीज सुरू झाल्याने पाण्यात वीज प्रवाह उतरून विठ्ठल सुदाम मालुसरे वय- ४५ ,सनी विठ्ठल मालुसरे वय- २६, आनंद ज्ञानेश्वर जाधव वय-५५, अमोल चंद्रकांत मालुसरे वय-३६ सर्व रा. निगडे ता.भोर या चौघांना पाण्यात विजेचा धक्का बसून चौघांचा मृत्यू झाला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे या चार जणांना जीव गमावा लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले गेले असून चौघेही एकाच गावातील असल्याने निगडे गावावर शोककळा पसरली आहे.