सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पुणे- सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर( खोपी) ता. भोर येथील शोगिनी टेक्नोआर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक तसेच उद्योजक विजयराव मुकुंदराव आठवले वय-७६ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील नवी पेठ येथे बुधवार दि.१४ निधन झाले. आठवले यांनी हजारो बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने १९७९ मध्ये पीसीबी उत्पन्नाचा व्यवसाय सुरू केला होता.नंतर १९८३ मध्ये या व्यवसायाला मोठे स्वरूप देत खेड शिवापुर जवळील खोपी ता.भोर येथे साध्या पत्र्याच्या शेडमध्ये कंपनी स्थापन केली होती.या कंपनीचे उद्योग क्षेत्रामध्ये सध्या मोठे नाव असून बहुतांशी बेरोजगार तरुण कंपनीमध्ये काम करीत आहे.उद्योगजगतेबरोबर सामाजिक क्षेत्रात आठवले यांनी काम केले असून शाळा,मंदिरे यांना कायमच ते मदत करीत असत. त्यांच्यामागे पत्नी ,तीन मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.