सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
सातत्याने पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी आत्महत्या करण्याचे प्रकार घडत असतात मात्र माळवाडी (संगमनेर) ता. भोर येथे २८ वर्षीय एका तरुणाने पत्नीच्या सतत होणाऱ्या शाब्दिक व मानसिक त्रासाला कंटाळून घरातील पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि.१३ घडली.याची फिर्याद भोर राजगड पोलिसात आत्महत्याग्रस्त तरुणाच्या पित्याने दिली.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळवाडी संगमनेर ता. भोर येथील तरुण अक्षय दत्तात्रय नेवसे वय-२८ याची पत्नी हर्षदा अक्षय नेवसे ही आत्महत्याग्रस्ताला शाब्दिक व मानसिक त्रास देऊन जगणे असह्य करीत होती.त्यामुळे तरुणाने राहत्या घरी पत्र्याच्या शेडला असणाऱ्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.राजगड पोलिसांनी आरोपी हर्षदा अक्षय नेवसे या महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता मा.कोर्टाने न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याने सदर महिला आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली गेली. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.