सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूर ता.भोर येथील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयाचा विद्यार्थी आर्यन रवींद्र पंडित याने बोरी ता. जुन्नर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ५४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविल्याने विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी आर्यन याची निवड झाली.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील असलेला आर्यन पंडित नियमित व्यायामाच्या जोरावर मेहनत करून आत्तापर्यंत कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट प्राविण्य मिळवत आलेला आहे.आर्यनने जिल्हास्तरावर कुस्ती खेळात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याचे तालुक्यातील कुस्ती शौकिनांकडून तसेच आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून अभिनंदन केले गेले.आर्यन याला यश खेचून आणण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश बुदगुडे,क्रीडाशिक्षक जयवंत थोपटे , श्रीरंग रवळेकर, सर्व शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मंडळ खानापूर यांनी मोलाची मदत केली