सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार असून तालुक्यात सर्वत्र भगवा फडकणार असल्याचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी भोर येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत सांगितले.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सचिन आहिर यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी आढावा बैठक घेतल्या असून शुक्रवार दि.९ भोर तालुक्यात पूर्व विभागाची शिवनेरी मंगल कार्यालय वर्वे येथे तर पश्चिम विभागाची भोर शहरातील गंगुबाई वाचनालय येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत जागा जिंकून भगवा कसा फडकला जाईल यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे, विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद हांडे, अविनाश बलकवडे, गणेश धुमाळ, पूर्व विभागाचे भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे, पश्चिम विभागाचे तालुकाप्रमुख हनुमंत कंक, अमोल पांगारे, अमित गाडे, समीर घोडेकर, दशरथ जाधव, बाळू वाटकर, दशरथ पिलाने, आरती खोपडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS