सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा / प्रतिनिधी
मेढा नगरपंचायतीच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर नोंदविलेल्या हरकतींवर सुनावणी वेळी योग्य तो विचार होईल अशी माहिती सहाय्यक संचालक, नगररचना विभाग सातारा संजय सांकला यांनी दिली.
मेढा नगरपंचायतीच्या प्रस्तावित विकास आराखडयाबाबत रहिवाशी शेतकरी बांधवांच्या अनेक शंका व प्रश्न असून या शंकांचे निरसन करण्यासाठी मेढा रहिवाशी शेतकरी बचाव संघाचे शिष्टमंडळ व सातारा नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संजय सांकला यांच्याबरोबर बैठक सातारा येथील त्यांच्या दालनात शिवसेनेचे नेते श्री एकनाथ ओंबळे यांचे विशेष प्रयत्नामुळे संपन्न झाली.
यावेळी या बैठकीस एकनाथ ओंबळे, विलासबाबा जवळ,सुरेश पार्टे,प्रकाश कदम,सचिन करंजेकर,सचिन जवळ, संदीप पवार,अरूण जवळ, रोहित देशमुख,राजेश करंजेकर,संतोष करंजेकर , डॉ.धैर्यशील गोळे,संतोष सांगवेकर,नंदू चिकणे इत्यादी प्रतिनिधी उपस्थीत होते. यावेळी प्रत्येकाने आपल्या व्यथा संबधीत अधिकाऱ्यांचे समोर मांडल्या.तर प्रस्तावित विकास आराखडा कसा अन्यायकारक आहे हे संबधीत अधिकाऱ्यांना पुराव्यानिशी पटवून दिले.
अधिक माहिती देताना श्री .साकला म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोरेगांव,लोणंद, मेढा,वडूज,दहीवडी,पाटण, खंडाळा या नव्याने नगरपंचायती झाल्या असून, कोरेगांव,लोणंद,मेढा या तीन नगरपंचायतीचा प्रस्तावित विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नगरपंचायतीने विकास आराखड्याला मंजुरी दिल्याने एजन्सी मार्फत सर्वे केला त्याप्रमाणे प्लॅन तयार करून देण्याचे काम आम्ही केले आहे.
आता यापुढे शेतकरी- रहिवाशी यांनी दिलेल्या हरकतींवर एका कमिटी मार्फत सुनावणी होईल.असे असले तरीही पुढील निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूकी नंतर नगरपंचायतीची बॉडी अस्तीत्वात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर पुढील कुठलीही कार्यवाही होणार नाही. तसेच करवाढी बाबत ही नगरसेवकांच्या बॉडी मध्येच ठरावा नंतरच निर्णय होणार आहे.विकास आराखडा प्रस्तावित केला असला तरी त्यामध्ये सर्वांच्या सुचनानुसार बदल होवू शकतो.ज्या हरकती दाखल झाल्या आहेत त्याच्यावर शासकीय कमिटी आपले म्हणणे ऐकून घेणार आहे असेही श्री. साकला यांनी सांगीतले व करवाढ व विकास आराखडा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान करवाढीसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून तोंडी सुचना आल्या असून त्याबाबत लेखी आदेश अद्याप मिळाला नसल्याचे नगरपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात आले. याबाबत मुख्याधिकारी अमोल पवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते . आऊट ऑफ रेंज मध्ये होते.
-------------------------
मेढा नगरपंचायतीची चतुर्थ करवाढ व प्रस्तावित विकास आराखडा याबाबत नागरिकांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना दिले असून त्याबाबत सविस्तर बोलणेही झाले असल्याचे श्री एकनाथ ओंबळे यांनी सांगितले.
------------------------
स्थगिती नव्हे तर करवाढीत सुट व प्रस्तावित विकास आराखडा रद्द होत नाही तोपर्यंत मेढा रहिवाशी शेतकरी बचाव संघाचा लढा कायम चालू राहाणार असल्याचे विलासबाबा जवळ, सुरेश पार्टे यांनी सांगीतले.
फो
COMMENTS