सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती (प्रतिनिधी) -
भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर चौदा जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात ऋषी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश्वर नगर परिसरात मोर्चाला संबोधित करत असताना गायकवाड यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर महाराष्ट्रात प्रथम जो काली शाही फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे येथे काळी शाई फेकली गेली.
शाई फेकणारा चा बारामतीत सत्कार करून त्याला 51 हजार रुपये बक्षीस देणार असेही गायकवाड यांनी जाहीर केले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. भाजप कार्यकर्तेअविनाश मोटे, पांडुरंग कचरे,ज्ञानेश्वर माने, सुधाकर पांढरे, जगदीश कोळेकर, चंद्रकांत केंगार आधी भाजप कार्यकर्ते यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
COMMENTS