सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत धोम तालुका वाई येथे रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 8.15 वा वार्षिक क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन वाई तालुका अथलेटिक्स असोसिएशन व नरसिंह हायस्कूल धोम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
ही स्पर्धा खुला गट, 20,18, 16 व 14 वर्षाखालील मुले व मुली या गटाकरिता होणार आहे. या स्पर्धेतून 25 डिसेंबर रोजी परभणी येथे होणाऱ्या राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडण्यात येणार आहे या स्पर्धेतून खुला गट व वीस वर्षाखालील खेळाडूंच्या गटातून प्रथम 6 तर 16 व 18 वर्षाखालील मुले व मुली यांच्या गटातून प्रथम 2 खेळाडूंची राज्य स्पर्धेकरिता निवड केली जाणार आहे तर 14 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा जिल्हास्तर मर्यादित राहणार आहे. स्पर्धेकरिता 50 रुपये प्रवेश फी असणार आहे. गुगल लिंक द्वारे दिनांक 9 डिसेंबर पर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत.तरी या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.