Wai breaking ! दौलतराव पिसाळ ! वन्यप्राणी व पक्षी यांची नखे जवळ बाळगूण त्यापासून दागिने बनवणारी महिला ताब्यात : वाई शहरात वनविभागाची मोठी कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी 
वन विभाग सातारा  वन परिक्षेत्र वाई येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका.सी.पाटील यांचे मार्गदर्शना खाली वनरक्षक आर.व्ही.भोपळे,वनरक्षक बोपर्डे, के.एस.जाधव वनरक्षक जांभळी, बी.बी.मराडे यांनी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार  वाई शहरातील बाजार पेठेत सोनार आळी येथील महावीर ज्वेलर्स दुकानात एक महिला, वन्यप्राणी व पक्षी यांच्या नख्यां पासून लॉकेट तयार करण्या करिता आली असता वनअधिकारी यांनी जागेवर पकडले.
        संबंधित महिलेवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करून सदरील मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास वनविभाग करत आहे. 
सदरची  कारवाई मा.महादेव मोहिते, उपवनसंरक्षक सातारा,मा.महेश झांजुर्णे,सहाय्यक वनसंरक्षक(वनीकरण), सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
To Top