बारामती ! माळेगावच्या शीतलचे जिल्ह्यात यश : ३५० गुण मिळवत जीडीसी अँड ए परीक्षेत जिल्ह्यात चौथी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माहेर माळेगाव व सासर पणदरे परिसरातील आबाजीनगर येथील वाघमोडे शितल राजेंद्र (शितल सुजित कोकरे )या युवतीने शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळामार्फत मे 2022 महिन्यात घेण्यात आलेल्या जी. डी .सी .अँड ए परीक्षेत जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.
          शैक्षणिक वर्ष 2021- 22 मध्ये शितल राजेंद्र वाघमोडे या शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर या संस्थेत एम .कॉम .द्वितीय या वर्गात शिकत होती .एम कॉम चे शिक्षण घेत जी .डी .सी अँड ए परीक्षेची तयारी करून तिने मे 2022 मध्ये झालेली परीक्षा पुणे येथील केंद्रात  दिली. जिल्ह्यातून  गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी या परीक्षेसाठी 2555 विद्यार्थी बसले होते .या परीक्षेत  शितल हिने 600 पैकी 350 गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकाविला. खडतर असलेल्या परीक्षेत ग्रामीण भागातून चौथ्या क्रमांकाचे यश मिळविलेल्या या युवतीचे परिसरात कौतुक होत आहे .
            शितल हिचा या परीक्षेचा संघर्ष कठीण होता .कारण कॉलेजमध्ये एम. कॉम प्रॅक्टिकल परीक्षा ही सुरू होत्या .तसेच लग्न झालेल्या असताना देखील तिचे सासरे दिलीप परशुराम कोकरे यांनी कायम मार्गदर्शन करीत व तिने स्वंयअध्ययन करून व अकाउंट सारख्या विषयांमध्ये प्राध्यापक अक्षय बळे सर यांचे मार्गदर्शन, घरातील सर्वांचा पाठिंबा, कष्टशिवाय यशाला पर्याय नसतो. हे जीवनी अंगीकारून अवघ्या पंधरा दिवसात परीक्षेला सामोरे जाऊन जिद्द ,मेहनत ,चिकाटी नियमित अभ्यास या माध्यमातून हे यश मिळाले असल्याचे शितल हिने सांगितले.
To Top