सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
११२ वर आलेल्या कॉलच्या अनुषंगाने भोर पोलीस हवालदार उद्धव गायकवाड व होमगार्ड संदेश काटकर यांनी भोर येथील स्मशानभूमी जवळील नदीपात्रात जीव देण्याच्या उद्देशाने नदीपात्रात उडी मारलेल्या वृद्धास वाचविले. घटनास्थळी माजी पोलीस पाटील कुमार किसन गजरे, वय -८० रा. वाघजाई नगर भोर ( मूळ गाव तळेगाव ढमढेरे ता. शिरूर )यांनी नदी पत्रातील पाण्यात उडी मारली होती. वृध्द गजरे यांना नातू अनिकेत संजय गजरे व हवालदार उद्धव गायकवाड तसेच होमगार्ड संदेश काटकर यांनी पाण्याबाहेर काढून वाचवले आहे.तसेच गजरे यांना नातीच्या ताब्यात देण्यात आले.
COMMENTS