सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
वाढदिवस म्हटलं की मोठ्या प्रमाणावर खर्च करून हाऊस मज आली.मात्र भोर येथे वाढदिवसाचा खर्च टाळून भोर शहरातील उन्नती महिला प्रतिष्ठान अध्यक्ष तसेच मराठा महासंघच्या तालुकाध्यक्ष सीमा तनपुरे यांनी स्तुत्य उपक्रम राबवित गरीब महिलांना साड्या व शेकडो चिमुकल्यांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केला.
तनपुरे या मागील दहा वर्षापासून हा उपक्रम राबवीत असून समाजाला एक चांगली दिशा देण्याचे काम करीत आहेत.तर आनंद नगर झोपडपट्टी येथे चिमुकल्यांना खाऊ वाटप केल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.यावेळी सीमा तनपुरे यांच्यासह बहुतांशी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होत्या.