वाई ! सर्वांगी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद : गणेश सातपुते

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
वाई : दौलतराव पिसाळ
विविध स्पर्धांच्या माध्यमांतून समाजात जागृती करण्याचे सर्वांगी प्रतिष्ठानचे कार्य प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार पुणे फेस्टीवलचे संस्थापक सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते यांनी व्यक्त केले. 
वाई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सर्वांगी प्रतिष्ठानच्या गौरी गणपती सजावट व दीपावली रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सातपुते बोलत होते. माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, उद्योजिका सौ. प्रियंका बाबासाहेब जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. योजना ताराळ, उद्योजिका शालिनी गायकवाड, सौ सुजाता रानभरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गौरी गणपती सजावटीतील नऊ गटातील चौतीस स्पर्धकांना तर दीपावली रांगोळी स्पर्धेतील बारा स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तीन विशेष विजेत्यांना सर्वांगी पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. 
गणेश सातपुते यांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करून आता वाईचे अनुकरण पुण्यात केले जाईल असे सांगितले.अनिल सावंत यांनी सर्वांगी प्रतिष्ठानला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वास सोनावणे यांनी स्वागत केले. केले. संस्था परिचय अध्यक्ष राजेश भोज यांनी करून दिला. उपाध्यक्षा सौ.पुनम ससाणे यांनी प्रास्ताविक केले स्पर्धांचा निकाल सौ सोनाली भोज व सौ अपर्णा गायकवाड यांनी जाहीर केला. पत्रकार अशोक येवले यांनी पाहुण्यांचा परिचय केला. सौ रंगता बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयसिंह पिसाळ, संजय गायकवाड, प्रकाश मांढरे,निता जगताप,सारिका ननावरे, छाया सोनावणे. सोनल ठक्कर,चारुशीला शहा, अरुणा पिसाळ, मिरा अडसूळ, सारिका गवते यांनी परिश्रम घेतले.
To Top