सोमेश्वर रिपोर्टर टीम------ वाई : दौलतराव पिसाळ काळंगवाडी येथे जागतिक मृदा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणे, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मा. विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर, बसवराज बिराजदार अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर श्री. बसवराज बिराजदार यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा समतोल वापर करावा आणि उत्पादनवाढीवर भर द्यावा व शेतकऱ्यांनी व्यावसायिक बनावे असे सांगितले. डॉ. श्री गणेश कदम, शास्त्रज्ञ भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणे, यांनी पुष्प उत्पादन बाबत सखोल मार्गदर्शन केले.डॉ. श्री नवीन कुमार फुल शेती मध्ये जमिनीचे आरोग्य, सेंद्रिय कर्ब याबाबत सखोल मार्गदर्शन केले.डॉ. श्री. किरण भगत भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुष्प निदेशालय पुणे केले जाणारे पोलीस शेतीमधील संशोधनाबाबत सखोल मार्गदर्शन केले.श्री. भूषण यादगिरवार विषय विशेषज्ञ, के.व्ही.के. बोरगाव यांनी हळद शेती बाबत सखोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले तसेच प्रगतशील शेतकरी श्री.धर्मराज देवकर व श्री कमलाकर धनावडे यांचा फुलशेती मधील उल्लेखनीय कामगिरी बाबत सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मा. श्री. प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी वाई यांनी केले तसेच कृषि विभाग राबवित असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच सूत्रसंचालन श्री. प्रदिप देवरे बी. टी.एम आत्मा यांनी केले. कार्यक्रमास मा. उपविभागीय कृषी अधिकारी, वाई, श्री. चंद्रकांत गोरड, डॉ.श्री नवीन कुमार, डॉ. श्री.संजय कड शास्त्रज्ञ भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणे, मंडल कृषी अधिकारी, भुईंज, श्री राजेंद्र डोईफोडे, श्री भाऊसाहेब शेलार व श्री प्रवीण बनकर कृषि पर्यवेक्षक, सरपंच माननीय श्री संजय निकम, माननीय श्री रोहिदास गायकवाड चेअरमन विकास सोसायटी, श्री राहुल वजरींकर पोलीस पाटील, प्रगतशील शेतकरी श्री रमेश गायकवाड, श्री संजय मोहळकर, श्री धनसिंग पवार, श्री विलास पवार व,ए.टी. एम. आत्मा योगेश जायकर, कृषि सहाय्यक परशुराम गवळी,विजय वराळे,सुजित जगताप, विनोद शेळके, सुनिल फरांदे,विक्रम मोहिते, उमेश संकपाळ, काळंगवाडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.