सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून आज अर्ज छाणणीच्या दिवशी अनेक उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे. ७०६ उमेदवारी अर्जापैकी १४ जणांचे उमेदवारी अर्ज अवैद्य झाले आहेत. यामध्ये सरपंचपदाचे ३ तर सदस्यपदाचे ११ उमेदवारी अर्ज अवैद्य ठरले आहेत.
अनेक गावांमधून एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही गावांमधून तर अनेक उमेदवारांच्यात हमरातुमरी पाहण्यास मिळाली. तालुक्यातील मोरगाव कऱ्हाटी, लोणीभापकर, मासाळवाडी, पळशी, पणदरे कुरणेवाडी, वाघळवाडी, मुरूम, वाणेवाडी, गडदरवाडी, सोरटेवाडी, सोनकसवाडी या १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी १०८ तर सदस्यपदासाठी ५९८ असे ७०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ कार्यक्रम जाहीर केला असून १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दि. ६ आणि ७ रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून दि
७ रोजीच सायंकाळी चिन्हांचे वाटप होऊन प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. बारामती तालुक्यातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी पणदरे, मोरगाव, मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी व गरदडवाडी ग्रामपंचायत निवडणूक ही लक्षवेधी होणार आहे. सरपंचपद जनतेतून असल्याने अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सरपंचपद खेचून आणण्यासाठी कंबर कसली आहे. सरपंचपद जनतेतून असल्याने अनेकांना सरपंचपदाचे स्वप्न पडले आहे. अनेक गावांमधून सरपंचपदासाठी रस्सीखेच दिसून येत आहे.
---------------------
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतसाठी गावनिहाय उमेदवारांच्या अवैद्य अर्जाची अंतिम यादी- सोमेश्वर रिपोर्टर
गाव सरपंच सदस्य
मोरगाव १ २
लोणीभापकर १ १
पळशी ० १
पणदरे ० ५
वाघळवाडी ० १
गडदरवाडी ० १
मासाळवाडी १ ०