बारामती ! पणदरेच्या माधुरीचे जिल्ह्यात यश : जीडीसी अँड ए परिक्षेत जिल्ह्यात पहिली

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काटेवाडी : गजानन हगवणे
बारामती तालुक्यातील पणदरे  परिसरातील मान्नाप्पा वस्ती  येथील माधवी महेंद्र अडसुळ या युवतीने शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळामार्फत मे २०२२ महिन्यात घेण्यात आलेल्या जीडीसीए परीक्षेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रंमाक पटकविला आहे .
        शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये. माधवी  अडसूळ हि शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर या संस्थेत एम.काॅम.द्वितीय या वर्गात शिकत होती. एम कॉमचे  शिक्षण घेत सी डी सी ए ची परीक्षा तयारी करून तिने मे 2022 मध्ये झालेली परीक्षा पुणे येथील केंद्रात परीक्षा दिली. जिल्ह्यातून गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी या परीक्षेसाठी दोन हजार पाचशे पंच्चावन्न विद्यार्थी  बसले होते. या परिक्षे मध्ये अडसुळ हिने सहाशे पैकी चारशे चार गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. खडतर असलेल्या या परिक्षेत ग्रामीण भागातून प्रथम क्रंमाकाचे यश मिळवलेल्या या युवतीचे परिसरात कौतुक होत आहे. 
      अडसुळ यांचा यापरिक्षेचा संघर्ष कठीण होता कारण काॅलेजमध्ये एम. काॅम.प्रॅक्टिकल परिक्षा ही सुरु होत्या पंधरा दिवसानी त्यांना जी. डी. सी. &ए परिक्षे ला सामोरे जावे लागले. स्वयंअध्ययन, आणि  अकाऊंट सारख्या विषयामध्ये प्रा. अक्षय बळे सर शिक्षक वृद्ध यांचे मार्गदर्शन, घरातील सर्वाचा पाठिबा, कष्टाशिवाय यशाला पर्याय नसतो, हेच जीवनी अंगीकारून परिक्षेला सामोरे जाऊन जिद्द, मेहनत, चिकाटी, नियमित अभ्यास या माध्यमातून हे यश मिळाले असलेचे अडसूळ हिने सागितले
To Top