जावली तालुका ग्रामपंचायत रणधुमाळी ! तालुक्यात सरपंचपदाचा १ तर सदस्यपदाचा १ उमेदवारी अर्ज अवैध : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतसाठी २३४ उमेदवार निवडणूक रिंगणात

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून दाखल झालेल्या अर्जापैकी आज छाननीमध्ये आज सरपंच पदाचा १ तर सदस्य पदाचा १ अर्ज अवैद्य ठरला. त्यामुळे १५ गांवच्या १५ सरपंचपदासाठी ४५ तर १५ गांवच्या १०५ सदस्य जागांसाठी १८९ अर्ज वैद्य ठरले आहेत.
     आज जावली तहसिल कार्यालयामध्ये उमेदवारांचे अर्जाची छाननी झाली. त्यामध्ये शिंदेवाडी येथील सरपंचपदाचा एक, तर कुसुंबी येथील सदस्य पदाचा एक असे दोन अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान सदस्य संख्येपेक्षा एकही अर्ज जादा दाखल न झाल्यामुळे रिटकवली, . रामवाडी, वाकी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे. सध्याच्या निवडणूकीत सरपंचपद हे जनतेतून निवडून द्यायचे असून सरपंच पद १ तर सदस्य संख्या ७ असणाऱ्या सर्वच ग्रामपंचायती असून दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे रिटकवली १( ७), मोरघर ३ ( २०), सोमर्डी-२( १५ ), आखाडे३ ( २४), केळघर५ ( ६ ), ओझरे ३( १७ ), रूईघर २( १२ ), शिंदेवाडी ३ ( ८ ), वालुथ ३( १६ ), रामवाडी १ ( १७ ), करहर ३ ( १७ ), भोगवली तर्फ कुडाळ  ७ ( ७ ) , वाकी _ १( ७), कुसुंबी ६ ( २१ ), घोटेघर २ ( ५ ), असे उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत. दरम्यान ७ डिसेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम दिनांक असून त्यानंतरच १५ पैकी १२ ग्रामपंचायतीचे निवडणूकीचा रागरंग स्पष्ट होणार आहे. तर निवडणूक लागल्यास १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
To Top