सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
वारंवार रजा मंजूर करण्यासाठी ,ड्युटी बदल करून मागितल्यास पैशांची मागणी करणारे भोर येथील एसटी आगार व्यवस्थापक युवराज कदम यांच्यावर पुणे येथील लाच लुचपत विभागाने छापा टाकून रंगे हाथ पकडुन कारवाई केलेची खळबळ जनक घटना सोमवार दि.५ घडली.
भोर एसटी आगारातील चालक तसेच वाहक यांना वारंवार ड्युटी बदल करून हवा असल्यास तसेच ज्यादाची रजा पाहिजे असल्यास आगार व्यवस्थापक पैशांची मागणी करीत होते तसेच पैसे घेतल्याशिवाय या कामगारांची ही कामे केली जात नव्हती.या नाहक त्रासाला कंटाळून आगारातील एका चालकाने लाच लुचपत विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली होती.या तक्रारीनुसार आगार व्यवस्थाकावर ४ हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी कारवाई केली.
बकामगार वर्गाला सळो की पळो करून सोडले होते
एसटी महामंडळ अडचणीच्या वाटेवर असताना कामगारांचे पगार वेळेवर होत नव्हते त्यातच रजा मंजुरीला पैसे ड्युटी बदल करण्यासाठी पैसे संध्याकाळी मद्य पिण्यासाठी पैसे असे वारंवार अनेक चालक व वाहकांकडे पैसे मागितले जात असल्याने भोर एसटी डेपोच्या आगार व्यवस्थापकांनी कामगारांना सळो की पळो करून सोडले होते असे कामगार वर्गाकडून सांगण्यात आले.