बारामती ! थोरल्या एपीआय असलेल्या भावाकडून बाळकडू घेत धाकटा भाऊ बनला पीएसआय : मुढाळेचे अनिल जायपत्रे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम- -------
वडगाव निंबाळकर : सुनिल जाधव 
बारामती तालुक्यातील मुढाळे  गावातील अनिल सावळाराम जायपत्रे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.           मोठा भाऊ शिवाजी जायपत्रे एपीआय पदी कार्यरत आहेत. त्याच्याकडून मिळालेले बाळकडू व  योग्य मार्गदर्शन   मेहनतिच्या व जिद्दच्या जोरावर अनिल जायपत्रे यांची पीएसआय पदी निवड झाली. मोठ्या कष्टाने, जिद्दीने अनिल पोलीस भरती झाला. पोलीस शिपाई नोकरी करत असताना जसा वेळ मिळेल तसा रात्र- दिवस एक करून अनिल ने अभ्यास केला. आणि आज उपनिरीक्षक पदी निवड  झाली.वडील सेवानिवृत्त  सावळाराम जायपत्रे हे वायरमेन व मोठा भाऊ  एपीआय शिवाजी जायपत्रे आणि लहान भाऊ राहुल जायपत्रे उद्योजक असा घराण्यातील बाळकडू योग्य मार्गदर्शन  असल्यामुळे अनिल जायपत्रे यांची आज पीएसआय पदी निवड झाली.
To Top