सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी बारामती न्यायालयाने पाच जणांचा जमीन अर्ज फेटाळला.
२०१०-२०११ साली सोमेश्वर पतसंस्थेतून ४७ लाख रुपयांचा अपहार झाला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. गेली दीड वर्षांपासून फरार असलेल्या रंजना प्रकाश होले, महेश मारुती जाधव, चंद्रकांत तुकाराम नवले, गणेश गंगाराम बनकर व गंगाराम मारुती बनकर यांनी बारामती न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.
------------------------