शिरोळ ! चंद्रकांत भाट ! विषय समिती निवडीत राजश्री शाहू विकास आघाडी व भाजपामध्ये समजोता एक्सप्रेस : निवडी बिनविरोध आघाडीला चार भाजपला दोन सभापतीपद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिरोळ : प्रतिनिधी
 शिरोळ प्रतिनिधी शिरोळ नगर परिषदेच्या विविध विषय समितीच्या निवडीच्या निमित्ताने सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये समजोता एक्सप्रेस धावली त्यामुळे विषय समितीच्या सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडल्या राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्षा सुरेखा पुजारी नगरसेवक राजेंद्र माने योगेश पुजारी व भारतीय जनता पार्टीचे श्रीवर्धन माने देशमुख सौ सुनीता आरगे यांना विषय समितीच्या सभापतीपदी संधी मिळाली आहे
बुधवारी पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी विकास खरात यांच्या उपस्थितीत विषय समितीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या तत्पूर्वी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांबरोबर चर्चा करून विषय समितीच्या सभापतीपदी सर्वांना संधी मिळावी यासाठी भाजपां नगरसेवकांना विषय समितीच्या सभापतीपदी संधी देण्याचा निर्णय घेतला भाजपाच्या नगरसेवकांनीही याला पाठिंबा देऊन दोन विषय समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या नगरसेवकांना संधी देण्याची विनंती केली त्यामुळे महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ सुनीता आरगे व शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी श्रीवर्धन माने देशमुख या भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांना संधी मिळाली त्याचबरोबर स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध उपनगराध्यक्षा सौ सुरेखा पुजारी सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी योगेश पुजारी स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी राजेंद्र माने या राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर नूतन सभापतींचा सत्कार नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी गेल्या चार वर्षात पालिकेच्या सर्व 20 नगरसेवकांनी शहराच्या विकासाकरीता एकत्रित कारभार करून आदर्श निर्माण केला त्यामुळे आपण शिरोळचा चेहरा मोहरा बदलू शकलो यापुढेही अशाच पद्धतीने नगरपालिकेचा कारभार सुरू ठेवून शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल असे सांगितले नगरसेवक पंडित काळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना विषय समितीच्या सभापतीपदी संधी दिल्याबद्दल राजश्री शाहू विकास आघाडीचे आभार मानले नगरसेविका जयश्री धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतामधून नूतन सभापतीचे अभिनंदन करून शहर विकासासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे आवाहन केले तर नूतन सभापतींनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करून गट तट पक्ष बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असे मनोगत व्यक्त केले मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते
           शिरोळ नगर परिषदेच्या विषय समित्या पुढील प्रमाणे स्थायी समिती सभापती अमरसिंह पाटील सदस्य योगेश पुजारी राजेंद्र माने सुरेखा पुजारी सुनीता आरगे श्रीवर्धन माने देशमुख सार्वजनिक बांधकाम समिती सभापती योगेश पुजारी सदस्य प्रकाश गावडे तातोबा पाटील इमरान अत्तार विदुला यादव स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती राजेंद्र माने सदस्य जयश्री धर्माधिकारी कमलाबाई शिंदे अनिता संकपाळ राजाराम कोळी पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापती सौ सुरेखा पुजारी सदस्य करुणा कांबळे कुमुदिनी कांबळे अरविंद माने कविता भोसले महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता आरगे उपसभापती सौ कमलाबाई शिंदे सदस्य करुणा कांबळे विदुला यादव शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती श्रीवर्धन माने देशमुख सदस्य तातोबा पाटील प्रकाश गावडे, कुमुदिनी कांबळे अनिता संकपाळ.
----------------
 गेली चार वर्षे शिरोळ नगरपरिषदेमध्ये काम करत असताना विधायक कामासाठी आणि जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका न घेता एकमुखी कामे व्हावीत याकरिता भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी कुठेही आड काठी न घेता विरोध न करता शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला आमचे नेते अनिलराव यादव व पृथ्वीराजसिंह यादव यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केल्यामुळे भाजपाचे नगरसेवक सौ सुनीता आरगे व श्रीवर्धन माने देशमुख यांना विषय समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी मिळाली
पंडित काळे नगरसेवक
-----------------------
शिरोळ नगर परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना विधायक कामासाठी सर्व नगरसेवकांनी एकमुखी पाठिंबा देऊन शहराचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केले यामुळेच कोठावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून शहरातील अनेक विकासकामे पूर्ण करण्यासाठी यश आले गेल्या चार वर्षात विरोधी सदस्यांनीही सामंजसाची भूमिका घेत शहर विकासाला चालना देण्यासाठी पाठबळ दिल्यामुळे एकही विरोधी ठराव झाला नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळेच विषय समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला
अमरसिंह पाटील नगराध्यक्ष
To Top