सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ टे्कनॉलॉजी अँड इंजिीअरिंग मधे ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून घेण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व संचालक संग्राम सोरटे यांच्या हस्ते पार पडले या रक्तदान शिबिरामध्ये सोमेश्वर परिसरातील रक्तदात्यांनी उस्पुर्त सहभाग नोंदवला यात महिला रक्तदात्यांचा ही मोठा सहभाग होता. या रक्तदान शिबिरा मधे ३१८ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तसंकलन पिशवी (Blood Collection Bag) संपल्याने रक्तदान शिबिर बंद करण्यात आले. तरीही काही रक्तदात्यांना या कारणास्तव माघारी जावे लागले. रक्तदात्यांना ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून स्मार्ट वॉच व वायरलेस हेडफोन भेट म्हणून देण्यात आले. हे रक्तदान पुणे येथील अक्षय ब्लड बँक यांच्या साहय्याने पार पाडण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी संचालक सुनील भगत,अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे,भारत खोमणे, अनिल गायकवाड,शिवाजी गायकवाड, कैलास मगर, तानाजी भापकर, शिवाजी शेंडकर, सागर गायकवाड, दत्तात्रय माळशिकारे,गणेश आळंदीकर, महेश जगताप, प्रदीप शेंडकर, सोनालकुमार शेंडकर, बाळासाहेब शेंडकर, बाळासाहेब शिंदे, सुहास गायकवाड, संतोष गायकवाड, धीरज गायकवाड,योगीराज मगर,अक्षय गायकवाड,दिनेश शेंडकर, प्रवीण गायकवाड ई उपस्थित होते.
सर्व रक्तदात्यांचे ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून आभार मान्यात आले.