भोर ! शिक्षकांचे रागावणे विद्यार्थी हिताचे : विद्याधर अनास्कर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे स्थान महत्वाचं असते. शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थी घडला तर त्याचे भविष्य घडेल या हेतूने विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात.यामुळे शिक्षण देत असताना शिक्षकांचे विद्यार्थांना रागावणे हिताचे असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ञ विद्याधर अनास्कर यांनी केले.                                                    शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अनास्कर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश राजे पंतसचिव होते.अनास्कर यांनी विद्यार्थांना बचतीचे महत्व तसेच बँक व्यवहारातील काही दाखले दिले. यावेळी व्यासपीठावर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,सचिव विकास मांढरे, सुरेश शाह, शुभम लध्धा ,राहुल राजभर, डॉ.सुरेश गोरेगावकर ,गजानन झगडे, प्राचार्य दीपक शिवतरे ,उपप्राचार्य संजय कडू ,पर्यवेक्षक विष्णू अवघडे ,शरद जाधव ,बहुसंख्य विद्यार्थी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक ,माजी विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विक्रम शिंदे यांनी केले.
To Top