भोर ! वनवासी कल्याण आश्रमाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 भोर येथील वनवासी कल्याण आश्रम केंद्र भोर येथे आश्रमाचा वर्धापन दिन कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी कै.बाळासाहेब देशपांडे यांची जयंती ही साजरी करून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पद्यांचे सादरीकरण केले तर प्रवीण जानकर, दिनेश डोईफोडे आणि प्रवीण बारामते या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
             गेली ७२ वर्षापासून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व निवासाची व्यवस्था आश्रम मार्फत केली जात आहे. कल्याण आश्रमाचे काम संपूर्ण भारतभर सुरू असून, एकल विद्यालय, आरोग्य रक्षक, श्रध्दा जागरण, वस्तीगृह, कौशल्य विकास, कृषी विकास, धर्म जागरण या विषयामध्ये आश्रम काम करत आहे.  यावेळी कल्याण आश्रम भोरचे सचिव डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह गणेश बारांगळे, व्यवस्थापक दिलीप लांघी उपस्थित होते. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय धुमाळ यांनी कल्याण आश्रमाच्या कार्याचा इतिहास व यशस्वी वाटचालीचा परिचय करुन दिला. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गिरी यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
To Top