सोमेश्वर कारखाना ! भावी उपाध्यक्षांचा चारचाकी गाडीचा मोह सुटेना : गाडी विक्री वरून मासिक सभेत खडाजंगी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी काटकासरीचा निर्णय घेत कारखान्याच्या चारचाकी गाड्या वापरायच्या नाहीत असा निर्णय घेत स्वतःची गाडी जमा केली. त्यानंतर लगेचच तातकालीन उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनीही आपली गाडी जमा केली. मात्र अध्यक्ष उपाध्यक्ष गाड्या वापरत नाहीत म्हणून आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत गाड्या विक्री करण्याचे ठरले मात्र उपाध्यक्षाची गाडी विकायची नाही यावरून मासिक सभेत संचालकांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 
            ३० डिसेंबरला सोमेश्वर कारखाण्याच्या नवीन उपाध्यक्षाची निवड होत असून या पदासाठी गुडघ्याला बासिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी गाडी विकण्याबाबत कडाडून विरोध दर्शविला आहे. अध्यक्ष यांचे वाहन विक्री करण्याचा निर्णय झाला मात्र उपाध्यक्ष यांचे वाहन विकण्याचा विषय आल्यानंतर पुरंदरच्या अनेक संचालकांनी विरोध दर्शवत वाहन विक्रीस मनाई केली. यावर कारखान्याच्या संचालकांच्यात खडाजंगी झाली. तीन महिन्यापूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी वाहने न वापरण्याचा निर्णय घेतला होता. 
To Top