वाई फेस्टिवल अंतर्गत चित्रकला स्पर्धा व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई प्रतिनिधी दि .११
वाईच्या महागणपती घाटावर दरवर्षी "वाई फेस्टिवल " साजरा होत असतो. यामध्ये कला, क्रीडा, नाट्य, नृत्य, संगीत, मनोरंजन, पाक- कला स्पर्धा, रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
      दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. भव्य चित्रकला स्पर्धा पार पडली. यामध्ये वेगवेगळ्या शाळेतील तसेच दिव्यांग विद्यार्थी यांनी व खुला गट अशा जवळपास १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळी ९.३० वाजता श्री. फादर टॉमी- डीन बेल एअर hospital पाचगणी यांचे हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. वाई फेस्टिवल अंतर्गत उत्कर्ष पतसंस्था, वाई जिमखाना व बालाजी ब्लड बँक यांचे वतीने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये २२७ महिला पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
      बाब।  याप्रसंगी वाई फेस्टिवल चे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी प्रस्तावना केली. उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, संचालक रमेश यादव,  आनंदराव कांबळे, मदनकुमार साळवेकर, श्रीकांत शिंदे,  मंगल अहिवळे, जमीरभाई शेख, सुनील कारले मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार व सर्व कर्मचारी वृंद व सर्व दैनंदिन प्रतिनिधी, तसेच वाई जिमखान्याचे सर्व संचालक, तसेच नितीन कदम, बाळासाहेब कोलार, विश्वास सोनावणे, श्री होनराव नगरपालिका शाळांमधील सर्व शिक्षक उपस्थित होते.
      फेस्टिवल चे निमंत्रक  अमर कोल्हापुरे यांनी फेस्टिवल अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगून वाईकरांनी या फेस्टिवल मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच आजपर्यंतच्या झालेल्या कार्यक्रमांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल आभार व्यक्त केले.
To Top