भोर ! भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्याबद्दल खेड शिवापुर टोलनाक्यावर आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पुणे- सातारा महामार्गावरील खेड शिवापुर ता.भोर येथे तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ संघटनांच्या वतीने एक तासाचे टोल नाका वसुली बंद आंदोलन छेडण्यात आले.
             पुरोगामी महाराष्ट्राला एक जातीय स्वरूपात भडकवण्याचे काम भाजपा करीत असून महापुरुषांबद्दल केलेले बेताल वक्तव्य माघार घेत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी अन्यथा हे आंदोलन पूर्णतः मोठ्या तीव्रतेने महाराष्ट्रात छेडले जाणार असल्याचे तालुक्यातील डॉ आंबेडकर चळवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी सांगितले.यावेळी आरपीआय आठवले गट भोर तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड ,युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ, भीम आर्मी तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, आरपीआय तालुका युवाध्यक्ष स्वप्निल सावंत, प्रदीप कांबळे ,भीम आर्मी वेल्हे तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड , रिपब्लिकन सेना भोर विधानसभा अध्यक्ष किशोर आमोलिक ,कुंदन गंगावणेआदींसह शेकडो आंदोलन कर्ते उपस्थित होते.


To Top