भोर ! आंबाडखिंड घाट झाला चकाचक : सार्वजनिक बांधकाम विभागाची मांढरदेवी यात्रेनिमित्त रस्त्याची साफसफाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
पुढील महिन्यात येऊ घातलेल्या मांढरगडावरील श्री काळुबाई देवी ता.वाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर काळूबाई देवी भक्तांना तसेच वाहनचालकांना घाट माथ्यावरील रस्त्यावरून वाहतुकीवेळी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तसेच भाविक भक्तांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग भोर यांनी एक महिना आगाऊ आंबाडखिंड (ता.भोर ) घाट परिसर स्वच्छ करून वाहतुकीसाठी सज्ज केला आहे.
               काळुबाई देवी यात्रेसाठी राज्यभरातून भाविक भोर -आंबाडखिंड घाट मार्गे येत असतात. काळुबाई देवी यात्रा एक महिन्यावर येऊन ठेपली असून या मार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहन चालकांना यात्रा काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडेझुडपे, गवत- वेली याची साफसफाई केली तर रस्त्यावर पडलेले खड्डे यांची डागडुजी करून दिशादर्शक फलक बसविले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली आहे.
To Top