सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील ११ ग्रामपंचांयतीसाठी आज मतदान सर्वत्र शांततेत झाले . तालुक्यात एकूण ७८ .५९ टक्के मतदान झाले . यामध्ये स्रियांनी 3873 व पुरुषांनी 4004 असे एकूण 7833 मतदानांनी आपला हक्क बजावला असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .
कुसुंबी व ओझरेसह चार ग्रामपंचायतीत काटे की टक्कर असून सरपंच पदासाठी २५ तर सदस्य पदासाठीच्या ९० उमेदवारांचे आज मतदान पेटीत भवितव्य बंद झाले आहे .
जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचयतींपैकी ४ बिनविरोध होवुन ११ ग्रामपंचयतींसाठी आज मतदान शांततेत झाले असून सरपंच पदासाठी २५ उमेदवार तर सदस्य पदासाठी ९० उमेदवार निवडणूकीत आपले भविष्य अजमाणार आहेत. ११ ग्रामपंचायतींपैकी कुसुंबी ग्रामपंचायतीत वार्ड क्र.मध्ये 54.66 टक्के वार्ड क्र २ 71.78 टक्के तर वार्ड क्र. 72.10 टक्के मतदान झाले तर अंदाजे करहर मध्ये ९० टक्के मतदान, मोरघर मध्ये ८५ टक्केव ओझरे येथे सरासरी ९० टक्के मतदान झाले असून ग्रामपंतीमध्ये काटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.
केळघर त. मेढा, रिटकवली, रामवाडी, वाकी या चार ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. मोरघर , सोमर्डी, ओझरे, करहर आणि कुसुंबी येथे समोरासमोर लढती झाल्या असून. सरपंच पदासाठी २५ उमेदवार तर सदस्य पदांसाठी ९० उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भावितव्य निकालात उद्या स्पष्ट होईल .
निवडूकीच्या रिंगणात असलेले सरपंच ( सदस्य ) गावनियहाय संख्या पुढील प्रमाणे मोरघर 2 ( १२), सोमर्डी-२( १ ४ ), आखाडे २ ( ८), ओझरे 2( १२), रूईघर २( ४ ), शिंदेवाडी २ ( २ ), वालुथ ३( ६ ), करहर २ ( १ ४ ), भोगवली तर्फ कुडाळ ४ ( ४ ) , कुसुंबी २ ( १२ ), घोटेघर २ ( २ ), असे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा गावकी व भावकी आणि मैत्रीला जास्त महत्व दिल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्मदर्शना खाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
COMMENTS