सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, गडदरवाडी व सोरटेवाडी ग्रामपंचायसाठी मतदान प्रक्रिया कोणताही अनुचीत प्रकार न घडता पार पडली. यामध्ये मताचा टक्का वाढला असला तरी याचा नक्की फायदा कोणाला होणार हे मंगळवारी मतमोजणी नंतरच समजणार आहे.
मुरूम ग्रामपंचायतसाठी ८५.५४ टक्के मतदान झाले. एकूण ४ हजार ७०० मतदानापैकी ३ हजार ८०० मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. याठिकाणी सरपंचपदासाठी २ तर १३ सदस्यांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. वाणेवाडी येथे ८०.७३ टक्के मतदान झाले असून ४ हजार ६२९ पैकी ३ हजार ३३७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चार सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून सरपंचपदासाठी २ तर १३ सदस्यपदासाठी १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
वाघळवाडीसाठी ८०.१७ टक्के मतदान पार पडले असून ३ हजार ५१ मतदारांपैकी २ हजार ४४१ मायदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. सरपंचपदासाठी ५ तर १३ सदस्यपदासाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. गडदरवाडी येथे ९० टक्के मतदान पार पडले असून १ हजार ११३ पैकी ९०९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. याठिकाणी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून सरपंच पदासाठी ३ तर ६ सदस्यपदासाठी १५ उमेदवार उभे आहेत. सोरटेवाडी ७९ टक्के मतदान झाले असून तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. सरपंचपदासाठी २ तर ६ सदस्यपदासाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि व सपोउनि योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.