सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील सम्राटचौक येथील वाकडे गेट जवळ मोहम्मद हनीफ बाबुलाल शेख वय -६५ रस्त्याने घरी चालत जात असताना मागून चारचाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापत होऊन शेख यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.२७ रात्रीच्या वेळी घडली.याची फिर्याद ईसाक मोहम्मद हनिफ शेख रा. बजरंगळी, मदर मोहला भोर यांनी दिली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि.२७ रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास भोर शहरातील सम्राट चौक येथील वाकडे गेट येथे पांढरे रंगाची होन्डा सिटी चारचाकी एमएच ४६ पी १८१९ या गाडीच्या अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील चारचाकी वाहन भरधाव वेगात, अविचाराने रहदारीचे नियमाकडे दुलर्क्ष करुन चालवुन महंमद हानिफ बाबुलाल शेख वय -६५ वर्षे यांना जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोके व हातापायास गंभीर दुखापत होऊन शेख यांचा मृत्यू झाला.वाहनचालक पळून गेला होता मात्र भोर पोलिसांनी मिळालेल्या गाडीच्या नंबर वरून त्याचा त्वरित शोध घेत वाहनचालक आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे व हवालदार राहुल मखरे करीत आहेत.