सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर आणि खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तसेच मृत्यूचा अड्डा बनलेल्या सारोळा पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील २१ वर्षीय तरुणीस स्थानिक तरुणांनी सतर्कता बाळगत जीवदान दिले.
सारोळा पुलावरून दुपारच्या दरम्यान एका तरुणीने पुलावरील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती स्थानिक तरुण बंटी धाडवे ,ग्रामपंचायत सदस्य शुभम दळवी, हर्षद बोबडे,साईनाथ धाडवे ,मनोज पांगारे ,साहील काजी यांना मिळताच घटनास्थळी पोचून नदीपात्रात असणाऱ्या मच्छीमारांच्या बोटीच्या सहाय्याने या तरुणीस पाण्यात बुडत असतानाच बाहेर काढून प्राथमिक उपचार केले.तात्काळ जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज नाणीज (सद्या कीकवी) यांच्या ॲम्बुलन्स ड्रायव्हर तुळशीराम अहिरे यांच्याशी संपर्क केला गेला. ॲम्बुलन्स तसेच किकवि पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश लडकत व राजेंद्र चव्हाण यांनी वाचविलेल्या तरुणीस किकवी ता.भोर येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.सध्या तरुणीवर उपचार सुरू तब्येतीत सुधारणा होत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.