वाई ! खैराचे झाड तोडल्याप्रकरणी वाई वनविभागाचा न्हाळेवाडीत छापा : संबंधीतावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
 वाई : दौलतराव पिसाळ
वन विभाग वाई मधील वनपरिक्षेत्र अधिकारी पी.सी.पाटील
व वनपाल एस.डी. लोखंडे, वनरक्षक आर. व्ही. भोपळे, श्री. डी. ए. कदम, बी. बी. मराडे हे वनक्षेत्रात फिरती करीत असताना न्हाळेवाडी तालुका वाई येथील विजय भिकू मोजर, सहदेव महादेव सुर्वे व विलास सहदेव सुर्वे यांच्या मालकीतील, खैर प्रजातीच्या झाडांची
अवैधरित्या विनापरवाना कटाई करीत असताना आढळून आले.
        सदरची खैर प्रजातींच्या झाडांची कटाई लाकूड व्यापारी साळेकर रा.महाड यांनी केली आहे याकामी वन विभागाचे वनरक्षक कदम यांनी "महाराष्ट्र
वृक्षतोड अधिनियम 1964" अन्वये संबंधितांवर गुन्हा नोंद करून खैर लाकूड माल जप्त करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई मा. महादेव मोहिते, उपवनसंरक्षक सातारा, मा. महेश झांजुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक,
सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदरच्या कारवाई मध्ये असे आढळून आले की लाकूड व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांना विनापरवाना झाडे तोडण्यास उद्युक्त करत आहेत, तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वन विभाग आवाहन करत आहे की, विनापरवाना वृक्षतोड करू नये.
To Top