जावली ! माहिती अधिकार,पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जावली तालुकाध्यक्षपदी रवींद्र जाधव यांची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम---------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
माहिती अधिकार,पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे. हे कार्यकौतुकास्पद असल्याचे मत सहायकपोलिस निरीक्षक अनिता मेणकर यांनीव्यक्त केले.यावेळी सेनेच्या जावली तालुकाध्यक्ष पदी मेढा येथील रवींद्र बबन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली
             सातारा येथील दैवज्ञ सभागृहात माहिती अधिकार,पोलिसमित्र व पत्रकार संरक्षण सेना संघटनेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण व पदाधिकारी मेळावा सोहळ्यात त्या बोलत होत्या.कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश सकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे, प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, महिलाध्यक्षा जयश्रीसावर्डेकर, जिल्हाध्यक्ष राजेश कानिमआदींची उपस्थिती होती.
                  सपोनि अनिता मेणकर यांनी संस्थेच्याकार्याविषयी गौरवोद्गार काढले. मेढा येथील रवींद्र बबन जाधव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांची सेनेच्या जावली तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले यावेळी अविनाश सकुंडे यांनी संस्थेच्या कार्याचाआढावा घेतला. कैलास पठारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
        संस्थेचे जिल्हाध्यक्ष राजेश कानिमयांनी स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष गौरव पवार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र बेलोशे यांनी आभार मानले. निशा लोहार यांनी सूत्रसंचालनकेले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष धनंजयअवसरे, हेमंत लंगडे, वैशाली क्षीरसागर,शुभांगी सोनावणे, नीता घोडके, मेघासुतार, राजेंद्र धादमे, मीनाक्षी बोंद्रे,स्मिता बाबर, प्राजक्ता शिंदे, अंकुशलोहार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी साताऱ्यासह कऱ्हाड, वाई, मेढा विभागातील संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
To Top