वाई ! विजांच्या कडकडाटासह तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी

Admin
2 minute read
वाई : दौलतराव पिसाळ 
वाई शहरासह तालुक्यातील गावांना विजेच्या कडकडाटासह वार्याने आणी मुसळधार पावसाने पाऊण तास झोडपून काढल्याने नागरीकांची धांदल ऊडाल्याचे चित्र दिसुन येत होते .
        पण विजांच्या मोठ मोठ्या आवाजामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या आठवडा भरा पासून वातावरणात मोठे फेरबदल झाल्याने  कधी कडाक्याची थंडी तर कधी कडक ऊन्हाचा चटका तर कधी अचानक आभाळ यायचे वातावरणातील  असे वारंवार होणार्या फेरबदला मुळे नागरीक त्रस्त झाले होते .या फेरबदलातील वातावरणाचा फटका गहू आणी हरभरा पिकांना बसत असल्याने शेतकरी चिंता ग्रस्त बनला आहे .
पण रविवार दि.४ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाई शहरासह तालुक्यात अचानक पणे विजांचा मोठ मोठ्याने आवाज ऐकु येवु लागल्याने नागरीकांन मध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले होते .व काही क्षणातच वादळी वार्यासह मुसळधार पावसाने वाई शहरासह तालुक्यातील काही गावे जवळ पास पावुन तास झोडपून काढल्याने नागरीकांची चांगलीच धांदल ऊडाल्याचे चित्र दिसुन येत होते .
To Top