सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
बावधन गावचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी सरपंच माधव बयाजी भोसले बापू यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले माधव बापू या नावाने बावधन परिसरात सुप्रसिद्ध होते शेती व जातीवंत खिलार बैल जोपासणे हा बापूंचा आवडता छंद होता त्यांनी कायमचा जोपासला वाढवला सामाजिक क्षेत्रातही एक आदर्श व्यक्तिमत्व न्यायिक भावनेतून बापूंनी समाजसेवा केली बापूंना बावधन गावचे सरपंच होण्याचा मान मिळाला त्यावेळी समाज एक संघ ठेवण्याचा प्रयत्न केला .
गावात सुधारणा केल्या पारंपारिक शेती करून हळद ऊस ज्वारी गहू पिकांचे भरघोस उत्पन्न घेतले व शेतकऱ्यांना शेतीचे मार्गदर्शन केले शेतीसाठी बैलगाडी व बैल जोडी बापूंना मोठा नाद व छंद होता जातिवंत खिलार बैलांची जोपासना करून त्यांचा उत्तम रीतीने सांभाळ केला होता बापूंचे शेती व बैलावर जीवापाड प्रेम होते माधव बापुंना बावधनचा बगाड्या होण्याचा बहुमान मिळाला होता बापूंनी कुटुंबावर चांगले संस्कार करून आदर्श कुटुंब पद्धत जोपासली थोरला मुलगा सुधाकर शेतीचा व्याप सांभाळतो आहे धाकटा मुलगा मदन आप्पा भोसले सामाजिक व राजकारणात यशस्वी पणे कार्य मग्न आहेत मदन आप्पा आदर्श सरपंच ते पंचायत समितीचे उपसभापती पदावर विराजमान झाले होते आता राष्ट्रवादी पक्षाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत आहेत सुधाकर व मदन आप्पा यांची मुले कर्तबगार उच्चशिक्षित झाली असून शेती व बांधकाम व्यवसाय करून यशस्वी कामगिरी करत आहेत बापूंनी शेतीतून प्रगती साधत हा कष्टाचा मळा फुलवला आहे ऐसा जन्म लाभावा देह चंदन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहावा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील कैलास वाशी माधव बापू भोसले यांच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंत्यसंस्कार समयी सामाजिक शैक्षणीक सहकार राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .