बारामती ! मोढवे येथील एकावर चाकूहल्ला : पाच जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
मोढवे ता . बारामती येथील एकावर पाच जणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूहल्ला केल्याप्रकरणी पाच जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           याबाबत सचिन पांडुरंग पिंगळे वय ३१ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा- कोळपेवस्ती, मोढवे ता बारामती जि. पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी 1) पवन सोपान पिंगळे 2) निरंजन देविदास मोटे 3) दशरथ खंडु कोळपे 4) सोपान बबन पिंगळे 5) देविदास सतु मोटे सर्व राह- कोळपेवस्ती, मोडवे ता.-बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
          याबाबत फिर्यादी २४ नोव्हेंबर रोजी चौधरवाडी- सोमेश्वर रोडवर सचिन पिंगळे हे  आपला मुलगा मानव वय 3 वर्षे याला घेऊन सोमेश्वर मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी मोटार सायकलवरून सोमेश्वर मंदीराकडे जात असताना आरोपी न 1 व आरोपी न 2 हे  मोटार सायकल वरून येवुन आरोपी न 1 याने फिर्यादीस तुला लाय मस्ती आली आहे काय असे म्हणुन  शिवीगाळ दमदाटी केली. त्यावेळी तेथे आरोपी न 3 हा आला  व त्याने हि फिर्यादीस  शिवीगाळ करून याला जिवंत ठेवु नकोस असे म्हणाला  त्यावेळी आरोपी न 2 याने त्याचे हातातील कुन्हाड फिर्यादीस  मारण्यासाठी उगारली तसेच  आरोपी न 1 याने त्याचे हातातील चाकु फिर्यादीचे  पाठीमागील उजवे पार्श्वभागावर मारून अपखुशीने दुखापत  केली  आहे. तसेस तेथून पळत असताना आरोपी न 4 व आरोपी न  5 त्यांनी फिर्यादीस  जिवंत ठेवणार नही  अशी धमकी देवून शिवीगाळ दमदाटी केली आहे. गुन्हयाचा पुढील  तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा खेडकर करत आहेत.
To Top