सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील बाजारवाडी ता. भोर येथील सद्या मुंबई येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या पै. पृथ्वीराज संतोष शिंदे यांनी मुंबई उपमहानिरीक्षक शहर कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक तर मुंबई जिल्हा शालेय स्पर्धेमध्ये ३५ किलो वजन गटात सुवर्णपदकाची कमाई केल्याने पृथ्वीराज याच्यावर भोर तालुक्यात तसेच वीसगाव खोरे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भोर तालुक्याच्या तसेच गावच्या नावलौकिकात भर टाकणारा हा कुस्ती क्षेत्रातील खेळाडू लहान वयात प्रकाशझोतात आला असल्याने पृथ्वीराज याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.पृथ्वीराज याचा मुंबई येथे बाजारवाडी ग्रामस्थ,तरुण तसेच विसगाव खोऱ्यातील कुस्ती शौकिनंकडून शुभेच्छा देत सत्कार सन्मान करण्यात आला.