वाई ! दौलतराव पिसाळ ! तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३२ उमेदवारी अर्ज दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी 
वाई तालुक्यातील महत्वपूर्ण सात गावातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २३२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 
         वाई तालुक्यातील गोवेदिघर काळंगवाडी पांडे चिखली, बोपर्डी कवठे भुईंज या सात ग्रामपंचायतींचे पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून आज अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती आज सात सदस्य संख्या असलेल्या गोवेदिगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पद अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव असून सरपंच पदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्यांसाठी 17 अर्ज दाखल झाले आहेत काळंगवाडी या सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव असून त्यासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य पदासाठी 31 अर्ज दाखल झाले आहेत पांडे या नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पद सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असून त्यासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य साठी 29 अर्ज दाखल झाले आहेत नऊ सदस्य संख्या असलेल्या किकली ग्रामपंचायतचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असून त्यासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य पदासाठी 29 अर्ज दाखल झाले आहेत.  बोपर्डी या नव सदस्य संख्या असलेले सरपंच पद सर्वसाधारण साठी राखीव असून यासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य पदासाठी 22 अर्ज दाखल झाले आहेत 11 सदस्य संख्या असलेल्या कवठे ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण स्त्री साठी राखीव असून त्यासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर सदस्य पदांसाठी 35 अर्ज दाखल झाले आहेत तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भुईंज या 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव असून त्यासाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत एकूण 69 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
     दाखल झालेल्या अर्जांची छाननी पाच डिसेंबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सात डिसेंबर आहे तर गरज पडल्यास 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून दिनांक 20 रोजी निकाल लागणार आहे.
To Top