सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे)
आज खऱ्या अर्थाने आनेवाडी गावच्या मुलांनी क्रीडा क्षेत्रात गावाचे नाव उज्वल केले आहे, आजच्या पिढीला मिळालेले यश हे कशा पद्धतीने मिळाले हे पुढील पिढीला समजले पाहिजे त्यासाठी त्यांचे अनुभव परिसरातील प्रत्येक शाळेत अनुभवण्यास व ऐकावयास मिळाले तर निश्चितच उद्या देशपातळी वर चमकणारे खेळाडू आपल्या परिसरातून नक्कीच घडतील असे प्रतिपादन राज्य नोडलं अधिकारी तथा कृषी व्यवसाय व्यवस्था तज्ञ् स्मार्ट प्रकल्प पुणे च्या सौ भाग्यश्री फरांदे यांनी केले.
आनेवाडी ता जावळी येथील विविध क्रीडा स्पर्ध्येत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा आनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला याप्रसंगी सौ भाग्यश्री फरांदे अध्यक्षस्थानी बोलत होत्या, यावेळी प्रमुख पाहुणे भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, जावळी तालुका पंचायत समिती माजी उपसभापती सदाशिव टिळेकर,सरपंच शेखर फरांदे, उपसरपंच अश्विनी फरांदे, आनेवाडी सोसायटी चेअरमन विवेक पवार,ग्रामपंचायत सदस्य सौ.किरण फरांदे, सुनीता फरांदे, सुनील फरांदे, भानुदास फरांदे, दिलीप आप्पा फरांदे, माजी सैनिक शिवाजी साखरे, पोलीस पाटील किशोर फरांदे,प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ बल्लाळ मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती,
सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे बोलताना म्हणाले,आज अश्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रात यश मिळवीलेल्या खेळाडूंचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आनेवाडी ग्रामस्थांनी त्याच्या पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे,यावेळी मुंबई येथे क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या भैरवनाथ क्रिकेट क्लबचे खेळाडू,तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनेवाडी तसेच पाटबंधारे वसाहत शाळा यांच्या तालुकास्तरीय झालेल्या विविध स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने मेडल देऊन सन्मान करण्यात आला,
यावेळी यशवंत फरांदे, डॉ विकास फरांदे, सरपंच शेखर फरांदे यांनी मनोगते व्यक्त केली, यावेळी सातारा पोलीस अधिकारी केशव फरांदे, मुंबई पोलीस अधिकारी भरत फरांदे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन जगताप रमेश जगताप,हरिश्चंद्र फरांदे फरांदे, दत्तात्रय फरांदे, वसंत फरांदे, सुभाष फरांदे, जयसिंग फरांदे जगन्नाथ फरांदे,अशोक शेडगे, सुनील गोरे, प्रभाकर गोरे,बबन फरांदे, पत्रकार धनंजय गोरे संतोष पिसाळ यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक यशवंत फरांदे, तर आभार प्रशांत गुजर यांनी मानले,