मोरगाव ग्रामपंचायत निवडणूक ! सोमेश्वर कारखान्याच्या माजी संचालकासह माजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांना विजयी मिरवणूक काढणे पडले महागात : पाच जणांवर गुन्हे दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  --
बारामती : प्रतिनिधी 
मोरगाव ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी रँली काढुन जेसीबीच्या सहायाने गुलालाची उधळान करुन  विनापरवाना डि.जे ची मिरवणुकीत वापर केल्याप्रकरणी मोरगाव येथील पाच जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
         याबाबत तुषार शिवाजी जैनक पो.कॉ.ब.नं.1380 वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक पोपट उर्फ कैलास सर्जेराव तावरे, माजी सरपंच निलेश हरिभाउ केदारी नवनिर्वाचित सदस्य अक्षय यशवंत तावरे यांच्यासह सुरज प्रल्हाद तावरे व समीर कैलास जाधव सर्व रा.मोरगाव ता बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
         वडील पाचही आरोपी यांनी  ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी रँली काढुन जेसीबीच्या सहायाने गुलालाची उधळान करुन  विनापरवाना डि.जे ची मिरवणुकीत वापर करुन  व मयुरेश्वर मंदिरा समोर विनापरवाना भाषण करून सभ्यता व नितीमत्ता यास धोका पोहचेल असे चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सुचनांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी सो पुणे यांचे  मनाई आदेषाचे भंग केला.वगैरे मजकुराच्या फिर्यादी वरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वारूळे करत आहेत. 

To Top