सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
ग्रामपंचायतचे सरपंच,सदस्य कोणत्याही एका विशिष्ट गटाचे नसून ते सर्वसामान्य जनतेचे असतात गावचा विकास हाच ध्यास मनी धरून सरपंच व सदस्यांनी जनतेच्या विकासासाठी झगडावे. सरपंच कोणत्याही पक्षाचा असो पुढील काळात लागेल तेवढा निधी देऊ मात्र नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांनी गावचा सर्वांगीण विकास करून नावलौकिक वाढेल याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले. भोर तालुक्यात २०२२ च्या झालेल्या ५४ ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी शनिवार दि.२४ थोपटे बोलत होते.यावेळी ४५ ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ शाल- श्रीफळ तसेच विठ्ठल -रुक्मिणी मूर्ती देऊन करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी राजगड ज्ञानपीठ मानत सचिवा स्वरूपा थोपटे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शिनगारे,राजगड कारखाना उपाध्यक्ष पोपट सुके,माजी सभापती बाळासाहेब थोपटे,लहूनाना शेलार,माजी जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे,माजी उपसभापती रोहन बाठे,सामाजिक कार्यकर्ते अनिलनाना सावले,राजगड संचालक उत्तम थोपटे ,सुधीर खोपडे,सोपान म्हस्के,ऍड.शिवाजी जांभूळकर,गीतांजली शेटे,नंदा जाधव,संपत दरेकर,अतुल किंद्रे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.