मेढा ! ओंकार साखरे ! कुसुंबीत दोन्ही सरपंचपदाच्या उमेदवारांना समान मते पडली.....! मंग न्यायनिवाडा गेला काळेश्वरी देवीच्या मंदिरात...देवीने कौल दिला आणि कुसुंबीचा सरपंच निवडला गेला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी 
जावली तालुक्यातील तिर्थ क्षेत्र म्हणून दर्जा प्राप्त झालेल्या आणि नवसाला पावणाऱ्या जागृत श्री काळेश्वरी देवीच्या मुळे  प्रसिद्ध असलेल्या कुसूंबी येथिल ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये लोक नियुक्त सरपंच पदाला दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने सरपंच पद चिट्ठी वर आले. श्री काळेश्वरी देवीने पॅनलसह सरपंच पद समानतेवर नेऊन ठेवल पण चिठ्ठीन मारुती ( बापु ) चिकणेंना तारल तर परस्पर्धी साधू चिकणेंना मारल. 
           यावेळी काळेश्वरी देवी ग्रामविकास पॅनल व श्री.काळेश्वरी देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनल यांच्यात काटे की टक्कर लढत झाली . जनतेचा कौल आज इकडे तर उद्या तिकडे अशी परिस्थिती दिसुन येत होती . त्यातच दुंद गावचे मतदार सहभागी झाले तर ते कोणाच्या पाठीशी जाणार अशी शंका घेतली जात होती. परंतु दुंद गावच्या मतदारांनी तटस्थ भुमिका घेतल्याचे समजते .
             या अटीतटीच्या लढतीत मतदारांनी दोन्ही पॅनलला समान कौल देत तीन तीन सदस्य निवडून दिले असताना जनतेतून सरपंच निवडीसाठी सुद्धा समान मतदान झाले. त्यामुळे सरपंच निवडीसाठी चिट्ठी टाकून सरपंच पदाची निवड करणे प्रशासनाला भाग पडले. प्रशासनाने चिठ्ठीच्या आधाराव सरपंच पदावर मारुती विष्णू चिकणे यांची निवड केली पण त्याच चिठ्ठीन जनतेने दिलेला कौल विरोधी उमेदवार साधु चिकणे यांची सरपंच पदाची संधी हिरावुन घेतली.
             तिर्थ क्षेत्र कुसुंबी गावची निवडणूक जिल्ह्यात नव्हे तर राज्यात लक्षवेधी ठरली आहे. आ. श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गट विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे गटात ही अटीतटीची लढत होती. आ. श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या श्री.काळेश्वरी देवी विकास पॅनलकडून थेट सरपंच पदासाठी  मारुती विष्णू चिकणे तर आ. शशिकांत शिंदे गटाच्या काळेश्वरी देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून साधू एकनाथ चिकणे हे रिंगणात होते. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने आपल्या विजयासाठी दोघांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र यावेळी मतदारांनी दोन्ही मतदारांना आपला समान कौल दिल्यामुळे दोघांनाही प्रत्येकी ६४८ मते मिळाल्याने निकाल धक्कादायक लागला होता. 
             सरपंच पदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे पुन्हा सरपंच पदाच्या निवडीसाठी चिठीद्वारे निवडीची प्रक्रिया घ्यावी लागली. यात दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्या टाकल्यावर लहान मुलीकडून चिठ्ठी उचलण्यात आली. यात मारुती विष्णू चिकणे यांची चिठ्ठी आल्यामुळे जनतेतून सरपंच पदी मारुती चिकणे यांची निवड झाली.
               विशेष बाब कि , वार्ड क्र. १ मध्ये शांता कोकरे, भारती चिकणे आणि नारायण चिकणे हे बिनविरोध झाले. वार्ड क्र. २ मध्ये विठठल सोनटक्के, सुमन चिकणे आणि प्रतिक चिकणे हा पूर्ण वार्ड श्री.काळेश्वरी देवी ग्रामविकास पॅनलचा निवडून आला तर वार्ड क्र. ३ मध्ये शालन गाडे, सुमन चिकणे व निवृत्ती मोरे हा पूर्ण वार्ड  काळेश्वरी देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे निवडून आले. तसेच या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन्ही उमेदवाराना समान मतदान झाले. त्यामुळे काळेश्वरी देवीने सर्वांना समान कौल दिला असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे मात्र चिठ्ठीने सरपंच पदासाठी मारुती चिकणे यांना तारल तर दुर्दैवी साधु चिकणे यांना मारल्याचे चित्र पहावयास मिळाले.
To Top