सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
तू इथे राहायचे नाहीस असे म्हणत एका महिलेला मारहाण केल्याप्रमाणी माळेगाव पोलीस ठाण्यात दोघांविराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कौशल्या आनंद कदम वय ३५ वर्ष राहणार अंजनगाव तालुका बारामती यांनी माळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी पुनम संतोष कदम व संतोष आनंद कदम दोन्ही राहणार अंजनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत, कौशल्या कदम यांच्यावर त्यांची जाऊ पूनम हिने संशय घेऊन तू इथे राहायचं नाही असे म्हणून शिवीगाळ लोखंडी ठोंब्याने व हाताने मारहाण करून संतोष यांनी लोखंडी पट्टीने डोक्यात व पाठीत मारून शिवीगाळ करून कौशल्याचे पती भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही लोखंडी पट्टीने मारून शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस नाईक वायसे करत आहेत.