सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील ३० ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीची मतदान मोजणी शांततेत सुरू झाली असून मोजणी झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांचे वर्चस्व निर्विवाद दिसून येत आहे.
सध्या १० ग्रामपंचायत पंचायतींचा निकाल जाहीर झाला असून उर्वरित २० ग्रामपंचायतचा निकाल प्रक्रिया सुरू आहे. निकाल केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करीत आहेत
.