बारामती ! सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासात महिलेला प्रथमच संधी : उपाध्यक्षपदी प्रणिता खोमणे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखाना स्थापनेपासून पहिल्यांदाच महिलेला संधी देण्यात आली आहे. कोऱ्हाळे येथील प्रणिता मनोज खोमणे यांची कारखान्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
               आज कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक कारखाना स्थळावरील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुचवलेल्या नावाची घोषणा यावेळी केली. 
           यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र यादव उपस्थित होते.
To Top